Share

पुणेकरांनी कोरोनाला हरवून दाखवलं; काल कोरोनाने एकही मृत्यू नाही

Published On: 

पुणे : राज्यात कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव कोणत्या शहरात असेल तर ते म्हणजे पुणे शहर. पुणे शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण अढळून आले होते. त्याच बरोबर मृत्यूची संख्याही सर्वाधिक होती. हीच रुग्णवाढ आणि मृत्यूसंख्या रोखण्यासाठी महपौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे महापालिकेने जीवाचं रान करत शहरासाठी युद्ध पातळीवर प्रयत्नन केले.

कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या. त्या उपाययोजनांना पुणेरांनीही भक्कम साथ दिली. आज समस्त पुणेकरांच्या साथीला आणि महापाालिकेच्या प्रयत्नांना यश आलंय. 6 फेब्रुवारी 2021 नंतर प्रथमच पुण्यात काल कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. असं असलं तरी महापौरांनी याचं सर्व श्रेय पुणेकरांना दिलंय. त्यांनी श्रेयासाठी कोणताही हक्क सांगितलेला नाही.

पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झालेली नाही. पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. काल (बुधवार) तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.6 फेब्रुवारी 2021 नंतर प्रथमचं पुण्यात कोरोनामुळं एकही मृत्यू झालेला नाही. पुण्याच्या महापौरांनी यासंदर्भात ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे.

‘पुणे महापालिकेने उभी केलेली आरोग्य, व्यापक पातळीवर केलेले लसीकरण आणि सण-उत्सवाच्या काळात पुणेकरांनी दिलेली साथ, यामुळे शहरातील कोरोना संसर्गस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. शिवाय ६ फेब्रुवारी २०२१ नंतर पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूसंख्या शून्यावर येणे हा मोठा दिलासा असून पुणेकरांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे’, असं म्हणत रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या रोखल्याचं संपूर्ण श्रेय मोहोळ यांनी पुणेकरांना दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!