Share

देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या यादीत पुणे अव्वल, तर टॉप-१० मध्ये राज्यातील ९ जिल्हे

Published On: 

दिल्ली : कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे. देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत टॉप-१० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. तर, पुणे जिल्ह्याचा क्रमांक यात अव्वल आहे.

‘पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बेंगलुरू अर्बन, नांदेड, जळगाव आणि अकोला या दहा जिल्ह्यांमध्ये सद्या सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण असून यातील बेंगळुरू हे शहर कर्नाटकातील तर इतर सर्व जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. तर, केंद्राने महाराष्ट्रात दुसरी लाट आल्याचा इशारा याआधीच दिला आहे. यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का ? अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

राज्य सरकारची महत्वपूर्ण बैठक !

राज्य सरकारची कॅबिनेट बैठक सद्या सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित सापडत आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेतला जात आहे. तर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिक रुग्ण सापडणाऱ्या शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाईल इशारा यादीच दिला आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार याकडं सर्वांचं लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!