Share

‘नितीन राऊतांनी पवारांच्या घरावर मोर्चा काढण्यापेक्षा स्वतःला अध्यक्षपद हवं असेल तर तसं सांगावं !’

Published On: 

पुणे : देशभरात सद्या आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. अशातच, पदोन्नतीसाठी देखील आरक्षण लागू करण्यात यावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. दरम्यान, आता या मुद्द्यामुळे महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील धुसफूस समोर आली आहे.

दलित-मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काहीच निर्णय घेतला जात नाही. मंत्रालयातील काही झारीतील शुक्राचार्य पुणाच्या तरी दबावाखाली येऊन ही अडवणूक करत आहेत. त्यामुळे पदोन्नतीतील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा. मीही या मोर्चात सहभागी होईन, असे आवाहन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेसच्या अनुसूचित जाती, जमाती सेलच्या कार्यकर्त्यांना केले

ओबीसींच्या प्रश्नांवर मंत्री उपसमिती बनते. त्याच्या अध्यक्षपदी ओबीसी मंत्र्याला नियुक्त केले जाते. मराठा आरक्षण विषयावर उपसमितीच्या अध्यक्षपदी मराठा मंत्र्याची वर्णी लागते. मात्र पदोन्नतीच्या विषयावरील उपसमितीचे अध्यक्ष दलित मागासमधील मंत्र्यास न करता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेमण्यात आले, असे का?, असा सवाल राऊत यांनी विचारला.

नितीन राऊत यांच्या मागणीवर आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी देखील भाष्य केलं आहे. ‘अजित पवार यांच्या घरावर कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून त्यात नितीन राऊतांनी सहभागी होण्यापेक्षा, नितीन राऊत यांनी अजित पवारांच्या घरावर मोठा मोर्चा काढून कार्यकर्त्यांना सहभागी करणे गरजेचे आहे’ असा सल्ला तृप्ती देसाई यांनी नितीन राऊत यांना दिला आहे.

पुढे त्या म्हणाल्या, ‘महाराष्ट्र काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी पदोन्नतीतील आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर राऊतांनी कार्यकर्त्यांना आवाहन करण्यापेक्षा त्यांनी नेतृत्व करून हा प्रश्न सोडवला पाहिजे. अजित पवार यांची नियुक्ती जर तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तुम्ही स्वतःच विरोध केला पाहिजे, कार्यकर्त्यांना कशाला कामाला लावताय आणि नितीन राऊतांना सदर पदोन्नती उपसमितीमध्ये अध्यक्षपद हवे असेल तर स्पष्टपणे बोललं पाहिजे,’ असा टोला देखील तृप्ती देसाई यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!