मुंबई : कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित सापडत आहेत. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेनं काही कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तर आज कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेतला जाणार असून पुढील कालावधीमध्ये काही कठोर निर्णय घेतले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली असून गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासह लॉकडाऊनबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होणार याकडं महाराष्ट्राचं लक्ष्य लागलं आहे. दरम्यान, या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित आहेत. मात्र, या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांना मागच्या दारानं यावं लागलं आहे.
सद्या सचिन वाझे प्रकरण, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं पत्र यामुळे अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता ते या बैठकीला मागील दाराने उपस्थित झाल्याने त्यांच्यावर भाजपने टीका केली आहे.
खंडणीखोरिचा आरोप असलेल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना कॅबिनेट बैठकीसाठी गपचूप मागच्या दाराने यावं लागतं यापेक्षा अधिक नामुष्की काय असू शकेल?
जनतेला तोंड दाखवू न शकणारा गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने अजूनही खुर्चीवर आहे… कारण वसुलीत सगळ्यांचा वाटा आहे. pic.twitter.com/LnZCOdXLGv— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 24, 2021
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी, ‘खंडणीखोरीचा आरोप असलेल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना कॅबिनेट बैठकीसाठी गपचूप मागच्या दाराने यावं लागतं यापेक्षा अधिक नामुष्की काय असू शकेल? जनतेला तोंड दाखवू न शकणारा गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने अजूनही खुर्चीवर आहे… कारण वसुलीत सगळ्यांचा वाटा आहे,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अर्णब गोस्वामींला दिलासा; अटकेपूर्वी द्यावी लागणार तीन दिवस आधी नोटीस
- कोरोनाचा धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यात होणार मध्यरात्रीपासून लॉकडाऊन
- पक्षाने आदेश दिल्यास मी पंढरपूरमधून पोटनिवडणूक निश्चितपणे लढवीन – राम शिंदे
- ‘या’ कारणासाठी उस्मानाबाद पालिकेने पटकावला राज्यात पहिला क्रमांक
- टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण ; ‘हा’ खेळाडू इतक्या दिवस राहू शकतो क्रिकेटपासून दूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

