🕒 1 min read
पुणे : पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. सध्या या दोन्ही शहरांचा पॉझिटिव्हिटी रेट हा ३ टक्क्यांच्या आसपास आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सूट देण्यास अनुकूलता दर्शवल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दोन्ही शहरांमध्ये सोमवार ते शुक्रवार सर्व सेवा, दुकाने, व्यापार हे रात्री ८ वाजेपर्यंत तर शनिवार-रविवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. यासोबतच, हॉटेल्स सर्व दिवशी रात्री १० पर्यंत सुरु राहतील अशी घोषणा देखील अजित पवार यांनी केली.
दरम्यान, आज पुणे शहरात आज नव्याने २२० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८८ हजार ९०२ इतकी झाली आहे. तर, शहरातील ३०४ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७७ हजार ८८३ झाली आहे. कोरोनामुक्तांचा आकडा हा नवीन कोरोना बाधितांपेक्षा अधिक असल्याने दिलासा कायम आहे.
यासोबतच, पुणे शहरात आज एकाच दिवसात ७ हजार ६४० नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २९ लाख ४३ हजार ९६३ इतकी झाली आहे. तर, उपचार घेणाऱ्या २ हजार २०६ रुग्णांपैकी २०२ रुग्ण गंभीर तर ३५४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. दरम्यान, महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ८१३ इतकी झाली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात नेमकी काय सूट ?
सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार, तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार, यासाठी ५० टक्के आसन क्षमतेची अट कायम ठेवण्यात आली आहे. शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मॉल देखील सुरु करण्यात येणार असून मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. मात्र लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा गोष्टी सांगत नाही, तर तो इतिहास रचतो’; मुख्यमंत्री ठाकरेंचा नीरजच्या कुटुंबियांना फोन
- अखेर पुणेकरांची मागणी मान्य; सर्व दुकाने व सेवा रात्री ८ पर्यंत सुरु, तर शनिवार-रविवारी…
- युवकांनो सावधान ;डेल्टा व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका तरुणांना
- आरटीई प्रवेश प्रक्रियेत बेकायदेशीरपणे प्रवेश होत असल्यास चौकशी व्हावी; पालक संघाची मागणी!
- ‘ती फक्त ट्रायल होती, त्यात एवढं काय भडकायचं ?,’ अजित पवारांचा भाजप नेत्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
