🕒 1 min read
औरंगाबाद : दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी हॉटेलवर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पडेगाव येथील हॉटेल मनीष इन या हॉटेल वर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
या घटनेनंतर सदर परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हॉटेल मालकाला धमकावण्याच्या उद्देशानेच हा गोळीबार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाउन लागू आहे. रात्री ८ ते पहाटे ५ पर्यंत शहरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरात रात्रीच्या वेळी पुर्णपणे शुकशुकाट असतो. संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये म्हणुन ठिकठीकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात असतो. असे असतांनाही सदर घटना घडली आहे.
मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पडेगाव येथील हॉटेल मनीष इन जवळ दोन अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून आले. त्यानंतर त्यांनी हॉटेलवर गोळीबार केला. त्यांनी हॉटेलवर दोन राउंड फायर केले. हल्ला करुन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
रात्री या घटनेची परिसरात चर्चा झाली. मात्र आज सकाळी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात गोळीबार करणारी व्यक्ती स्पष्टपणे दिसत आहे. धमकविण्याच्या उद्देशाने हा गोळीबार केल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. परं या घटनेने परीसरातील नागरीक प्रचंड दहशतीमध्ये आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अनिल देशमुखांवरील समिती म्हणजे जनतेला एप्रिल फूल बनवण्याचा प्रकार’
- ‘जो ‘शांडिल्य’ या ‘जनेऊधारी’ नहीं उनका क्या?’ ओवेसिंनी साधला ममतांवर निशाणा
- ‘आसामला घुसखोरांचा अड्डा कदापि बनवू देणार नाही’
- ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी भडकले
- “…मानसिक तयारी ठेवा”, राजेश टोपेंचा जनतेला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

