Share

१०० कोटींच्या वसुलीप्रकरणी शरद पवारांच्या चौकशीची मागणी; हायकोर्टात याचिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. मुंबईत स्फोटकांनी गाडी सापडल्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे दुखावलेल्या परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत पत्र लिहिले होते. देशमुखांनी सचिन वाझेंना १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा गंभीर आरोप देखील परमबीर सिंह यांनी केला होता.

यासोबतच, बदलीबाबत देखील आक्षेप घेत परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च नायालयात जाण्याचा सल्ला दिल्यानंतर आता या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्युलिओ रिबेरीओ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली जावी अशी मागणी केली होती.

तर, पेशाने वकील असलेल्या घनश्याम उपाध्याय यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ‘दरमहा १०० कोटी म्हणजे वर्षाला बाराशे कोटी, तर पाच वर्षांचा विचार करता हा घोटाळा खूप मोठ्या स्वरूपाचा आहे. PMLA कायद्याअंतर्गत याची सखोल चौकशी व्हावी. तसेच, या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींची साधी चौकशी नाही तर त्यांना ताब्यात घेऊन (कस्टडीअल) चौकशी व्हावी.

यासोबतच, परमबीर सिंह यांनी या प्रकरणाची शरद पवार यांना देखील माहिती दिली होती. यानंतर पवारांनी ज्युलिओ रिबेरीओ यांच्या मार्फत चौकशीची मागणी केली होती. मात्र, ज्युलिओ रिबेरीओ यांचं वय आता नव्वदीपार आहे. तरीदेखील त्यांच्यामार्फत चौकशी करण्याची मागणी पवारांनी करण्यामागे काय हेतू होता ? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केला आहे. यावर न्यायालयात युक्तिवाद देखील सुरु असल्याचं समजत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!