🕒 1 min read
मुंबई : शरद पवार यांना २९ मार्च रोजी पोटदुखीनंतर ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर पित्ताशयामध्ये समस्या उघडकीस आली. यानंतर, डॉक्टरांनी ३१ मार्च रोजी ऑपरेशनसाठी वेळ दिला होता, परंतु मंगळवारी पोटदुखी सुरु झाल्याने त्यांना निर्धारित ऑपरेशनच्या एक दिवस आधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. पवार यांनी मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यानंतर डॉक्टरांनी रात्री उशिरा त्यांच्यावर ऑपरेशन केले.
पवार यांना आज रुग्णालयात दाखल करुन त्यांची एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र मंगळवारी रात्रीच पवार यांच्या पोटात जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्रीच पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पित्ताशयाचा खडा शस्त्रक्रिया करुन काढला असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.
परंतु आता शरद पवारांच्या यांच्या उत्तम आरोग्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या कार्यकर्त्यांनी देव पाण्यात ठेवून होम-हवन केलेले आहे. पुण्यात जनता वसाहतीमधील विठ्ठल मंदिरात कार्यकर्त्यांनी पूजा केली. शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, म्हणून देवाला साकडं घालण्यात आलं. तर काल मुंबईतील बोरीवलीतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी होम हवन आणि पूजा केली. होती. शरद पवारांच्या फोटोसमोर पूजा आणि हवन करण्यात आले होते.
या शस्त्रक्रियेवेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात उपस्थित होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रात्री उशीरा हे सर्वजण ब्रीच कँडीमधून घरी परतले. सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांना दोन ते तीन दिवसांत रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, असे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- पडेगावातील हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार! शहरात एकच खळबळ
- शिवसेनेच्या नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; नाराज भास्कर जाधवांची लागली वर्णी
- ‘अनिल देशमुखांवरील समिती म्हणजे जनतेला एप्रिल फूल बनवण्याचा प्रकार’
- ‘ “परमवीर” घोड्याचे रूपांतर “शरमवीर” मध्ये होऊन भक्तांची तोंडं काळी होण्यास सुरुवात झालीये’
- ‘गोकुळ’चा संचालक व्हायचं असेल तर एका दमात दहा लिटर दूध काढून दाखवा – राजू शेट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

