Share

‘अनिल देशमुखांवरील समिती म्हणजे जनतेला एप्रिल फूल बनवण्याचा प्रकार’

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. मुंबईत स्फोटकांनी गाडी सापडल्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे दुखावलेल्या परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत पत्र लिहिले होते.

या लेटरबॉम्बचे राज्याच्या राजकारणात देखील मोठे पडसाद उमटत आहेत. तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. तर, काल (मंगळवारी) परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशीसाठी महाविकास आघाडी सरकारने समितीची घोषणा केली आहे. निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

मात्र, या समितीच्या स्थापनेवर भाजपने टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून एप्रिल फुल केल्याची टीका केली आहे.

‘परमबीर सिंह यांच्या पत्राला अनेक दिवस उलटूनही सरकार ढिम्म होतं. मात्र, उच्च न्यायालयात याचिकेची सुनावणी होणार हे कळल्यानंतर राज्य सरकारने काल ही समिती स्थापन केली. तर ही समिती, चौकशी आयोग अधिनियम, १९५२ अंतर्गत नेमलेली नाही. त्यामुळे या समितीला कोणालाही नोटीस बजावण्याचा अधिकारच नाही. तसेच, समितीच्या चौकशीसाठी संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी उपस्थित राहणे देखील बंधनकारक नसेल. त्यामुळे ही समिती म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून एप्रिल फूल बनवण्याचा प्रकार आहे,’ असा घणघत केशव उपाध्ये यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!