पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस कचरा प्रश्न गंभीर होत चालला आहे. वस्त्यांमध्ये कचरा मोठ्या प्रमाणावर साठत आहे. पण त्यांना जागेअभावी कचरा जिरवण्यासाठी प्रकल्प उभारता येत नाही. मात्र दुसरीकडे मोठ्या सोसायट्यांमध्ये जागा असून देखील काही सोसायट्या असे प्रकल्प उभारण्यात कुचराई करत आहेत. अशा सोसायट्यांवर आता पुणे महापालिकेने कारवाईचा बडगा उचलला आहे.
शंभर किलोपेक्षा अधिक कचरा तयार होणाऱ्या सोसायट्यांमधील कचरा न उचलण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. त्यावर योग्य ती प्रक्रिया करून जिरवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. १ एप्रिलपासून हा निर्णय लागू होंणार असल्याचे महापालिकेने काढलेल्या नोटिसमधून नमूद करण्यात आले आहे.
पालिकेचे प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने जवळपास तीनशे ते चारशे टन कचरा डंपिंग करावा लागत आहे. आता शासनाने दिलेल्या आदेशानुसार ज्या सोसायट्यांमध्ये शंभर किलोपेक्षा जास्त कचरा तयार होत आहे. अशा ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मोठ्या सोसायट्यांमध्ये जागाही उपलब्ध असल्याने ते असे प्रकल्प उभारू शकतात. काहींनी दाखवण्यापुरते कचरा विघटनाचे प्रकल्प उभारले आहेत. अशा सोसायट्यांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. कचरा प्रक्रिया केली जात नसल्यास ५ ते १५ हजार पर्यंतचा दंड आकाराला जाणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आकाश चोप्राने सांगितलं आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीमचं नाव
- ‘व्याजदरांमध्ये कपातीचा निर्णय फिरवलात; आता अशीच तत्परता पेट्रोल, डिझेलवर लादलेली दरवाढ मागे घेण्यात दाखवा’
- जालन्यात व्यापाऱ्यांसह ग्राहकांवर कारवाई
- ‘फडणवीस यांनी नागपूर महापालिका व शहराकडे लक्ष देणे गरजेचे हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही’
- आयपीएलच्या आधी चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का ; वेगवान गोलंदाजाची स्पर्धेतून माघार


