मुंबई : जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आयपीएल येत्या ९ एप्रिल पासुन सुरु होत आहे. यंदाच्या सत्रातील पहिला सामना हा रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये आहे. यंदाच्या आयपीएल सत्रासाठी अनेक खेळाडू हे आपआपाल्या संघाच्या सराव शिबीरात दाखल झाले आहेत. जगातील सर्वात मोठी लीग म्हणून आयपीएलकडे पाहिलं जातं. या लीगमध्ये कित्येक खेळाडूंची स्पप्न साकार झाली आहेत. मागच्यावेळी युएईमध्ये झालेली स्पर्धा यंदा भारतात होत आहे.
आयपीएल सुरु होण्याआधीच आयपीएलच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. क्रिकेट रसिकांमध्ये आत्तापासूनच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान, समालोचक आकाश चोप्राला आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम कोणती?, असा प्रश्न विचारला असता त्याने मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधली सगळ्यात खतरनाक टीम असल्याचं सांगितलं.
एका युट्यूब फॅन्सच्या प्रश्नाला उत्तर देताना आकाश चोप्राने मुंबई इंडियन्स ही या मोसमातील सगळ्यात विस्फोटक आणि करंडकाची प्रबळ दावेदार असलेली टीम सांगितली. मुंबईजवळ रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, इशान किशन, सूर्या, पांड्या ब्रदर्स असे एकाहून एक विस्फोटक फलंदाज आहेत. त्यामुळे मुंबईला रोखणं प्रतिस्पर्धी संघासाठी अवघड जाणार आहे, असं आकाश चोप्रा म्हणाला.
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) वादग्रस्त सॉफ्ट सिग्नल नियम हटवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आयपीएलच्या 14 व्या हंगामात मैदानी अंपायरला आता सॉफ्ट सिग्नल डिसीजनचा वापर करता येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय महिला संघात कोरोनाचा शिरकाव; हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण
- बॉलिवूडवर कोरोनाचं सावट ; प्रसिद्ध संगीतकार ‘बप्पी लहरी’ कोरोना पॉजिटीव्ह
- आयपीएल आधी मुंबई, चेन्नई आणि दिल्लीच्या संघांना मोठे धक्के
- ‘कोरोना आम्हाला स्पर्शही करणार नाही’ या फाजील आत्मविश्वासातून कोरोना वाढत गेला’
- बीड जिल्हा; पीपीई कीट घालून जिल्हाधिकारी रवींद्र जगताप कोरोना रुग्णांच्या भेटीला


