🕒 1 min read
नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून राज्यासह देशातील जनतेवर कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या परिस्थिती मध्ये लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांच्या हाताचा रोजगार गेला. तर मध्यमवर्गीयांवर महागाई आणि आर्थिक कपातीची कुऱ्हाड पडली असताना त्यात नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लघु बचत योजनेवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने संकट उभे राहिले होते.
मात्र त्यांनतर केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. सीतारमण यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. या ट्विटनंतर कोट्यावधी लोकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. त्यामुळे आता भारत सरकारच्या लहान बचत योजनांचे व्याज दर 2020-2021 च्या शेवटच्या तिमाहीत उपस्थित असलेल्या दरावर राहतील.
यावर स्पष्टीकरण देताना अर्थमंत्र्यांनी नजर चुकीने हा आदेश देण्यात आल्याचे सांगितलं आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आले असल्याची माहिती बुधवारी रात्री मिळाली होती. परंतु आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. यामध्ये किसान विकास पत्र (KVP), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धि योजना यांचा समावेश आहे.
Interest rates of small savings schemes of GoI shall continue to be at the rates which existed in the last quarter of 2020-2021, ie, rates that prevailed as of March 2021.
Orders issued by oversight shall be withdrawn. @FinMinIndia @PIB_India— Nirmala Sitharaman (@nsitharaman) April 1, 2021
दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला. सरकारचे याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला.आता केंद्र सरकारने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती’. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला. सरकारचे याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला.आता केंद्र सरकारने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती. @nsitharaman https://t.co/IwaBd8Z21X
— Supriya Sule (@supriya_sule) April 1, 2021
महत्वाच्या बातम्या
- आयपीएलच्या आधी चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का ; वेगवान गोलंदाजाची स्पर्धेतून माघार
- ठाणे जिल्हा बँकेत महाविकासआघाडीचा दारुण पराभव, बविआ-भाजपचे निर्विवाद वर्चस्व
- हम नहीं सुधरेंगे! महावितरणचा भोंगळ कारभार, वीज कनेक्शन तोडूनही आले शंभर युनिटचे बिल
- छोट्या बचत योजनांचे व्याज दर कमी करण्याचा निर्णय मागे; सर्वसामान्यांना दिलासा
- सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
