जालना: दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने प्रशासन तसेच रुग्णालयांच्या नाकीनऊ येत आहे, तरी देखील नागरिकांचा तसेच व्यापाऱ्यांचा निष्काळजीपणा काही कमी होत नाहीये. जालना शहरात दुकांनांवर नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसून आले, कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवणं सुरु आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत दोन दिवसांमध्ये ७० व्यापाऱ्यांसह ग्राहकांवरही दंडात्मक कारवाई पोलिसांकडून करण्यात आली.
शहरात विनामास्क फिरणारे तसेच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या २० पथकांची स्थापना नगरपरिषदेकडून करण्यात आली आहे. या पथकाने शहरातील अनेक भागांमध्ये जाऊन विनामास्क फिरणारे तसेच विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत व्यापारी, दुकानदार तसेच या दुकानांमध्ये गर्दी करणाऱ्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अशीच चालू राहील अशी माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांमध्ये कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीची जाणीव व्हावी यासाठी देखील स्थानिक प्रशासन प्रयत्न करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय महिला संघात कोरोनाचा शिरकाव; हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण
- बॉलिवूडवर कोरोनाचं सावट ; प्रसिद्ध संगीतकार ‘बप्पी लहरी’ कोरोना पॉजिटीव्ह
- आयपीएल आधी मुंबई, चेन्नई आणि दिल्लीच्या संघांना मोठे धक्के
- ‘कोरोना आम्हाला स्पर्शही करणार नाही’ या फाजील आत्मविश्वासातून कोरोना वाढत गेला’
- बीड जिल्हा; पीपीई कीट घालून जिल्हाधिकारी रवींद्र जगताप कोरोना रुग्णांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

