🕒 1 min read
पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद पुणे शहरात करण्यात येत होती. दरम्यान, शहरातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम आता दिसू लागला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात नव्याने ३ हजार ९९१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा हा कमी होताना दिसत असल्याने संकटात काहीसा दिलासा मिळत आहे.
धन्यवाद पुणेकर : सलग सहाव्या दिवशी नवी रुग्णसंख्या कोरोनामुक्त संख्येपेक्षा कमी !
पुणे शहरात कोरोना निर्मूलन उपाययोजनांना मोठे यश मिळत असून सलग सहाव्या दिवशी नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज नवे ३,९९१ रुग्ण तर ४,७८९ रुग्ण बरे झाले.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 24, 2021
अधिक दिलासादायक बाब म्हणजे आज सलग सहाव्या दिवशी कोरोना मुक्तांची संख्या ही बाधितांपेक्षा अधिक आहे. आज ४ हजार ७८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशातच, राज्य सरकारने कडक लॉकडाऊन लागू केल्यामुळे शहरातील बाधितांची संख्या कमी होण्यास अधिक वेग येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशीच रुग्णसंख्या घटत राहिल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे ‘आता नको कोणतीही ढिलाई, बाकी आहे मोठी लढाई !’ असं आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इथं पाकिस्तानच्या मुशर्रफचं राज्य नाही, पाटीलकी संपली म्हणून मुश्रीफांना पुढं ककेलंय का ?’
- केंद्र सरकार जबाबदारी झटकत असेल पण महाराष्ट्र सरकारने झटकू नये; काँग्रेसचा घरचा आहेर
- …अन् ‘त्या’ फोनमुळे नागपुरात ऑक्सिजनची मोठी मदत; फडणवीसांनी मानले आभार !
- भाजपच्या विनाशाला CBI ची टोळधाडच कारणीभूत ठरणार; मिटकरींच भाकीत
- ‘ताई, काळजी घ्या! वैद्यनाथ कृपेने लवकरच ठिक व्हाल’, धनंजय मुंडेंच्या खा.प्रीतम यांना सदिच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

