मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने गुन्हा दाखल करुन छापेमारी केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर, देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सीबीआयच्या विविध पथकांनी देशमुख यांच्या तब्बल 10 ठिकाणांवर छापे मारले.
दरम्यान सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता देशमुखांना अटक करा अशी मागणी याचिकाकर्त्या ऍड. जयश्री पाटील यांनी केली आहे. अनिल देशमुखांविरोधात सबळ पुरावे सीबीआयकडे असल्याने त्यांना अटक झाली पाहिले अशी जोरदार मागणी जयश्री पाटील यांनी केली आहे.
यासोबतच, सीबीआयच्या कारवाईवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संशय व्यक्त केल्यानंतर जयश्री पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर प्रहार केला आहे. ‘मुश्रीफ यांना सांगायचंय, की येथे पाकिस्तानच्या मुशर्रफचं राज्य नाही. पाटीलकी संपली म्हणून मुश्रीफांना पुढे केलंय का ? जे पुढे येऊन रोज बोलत आहेत. त्या सगळ्यांची नावे पुढे येणार आहेत,’ असा गंभीर इशारा जयश्री पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला आहे.
यासोबतच, ‘हाय कोर्टाच्या ऑर्डरनुसार परिच्छेद 41, 82, 83 नुसार सीबीआयला कारवाईचे आदेश आहेत. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कोर्ट ऑर्डर वाचावी. टीका करून दिशा भरकटवून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा प्रसार करू नये,’ असं देखील पाटील म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांचा धडाकेबाज निर्णय! रेमडेसिवीर, लस पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार
- केंद्र सरकार जबाबदारी झटकत असेल पण महाराष्ट्र सरकारने झटकू नये; काँग्रेसचा घरचा आहेर
- …अन् ‘त्या’ फोनमुळे नागपुरात ऑक्सिजनची मोठी मदत; फडणवीसांनी मानले आभार !
- भाजपच्या विनाशाला CBI ची टोळधाडच कारणीभूत ठरणार; मिटकरींच भाकीत
- बुडत्याला काढीचा आधार; अखेर करमाळाकरांना ३० ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध होणार


