Share

पुण्यात आज कोरोनामुळे मृत्यूचा तांडव, ‘इतक्या’ रुग्णांनी गमावला जीव

Published On: 

पुणे : राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. पुण्यात तर कोरोनाने अक्षरशः हाहाकार उडाला आहे. आज (१६ एप्रिल) पुण्यात एकाच दिवशी तब्बल ५१ कोरोना बाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर पुण्यात आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ६ हजार ००२ इतकी झाली आहे. पुणे शहरात आज नव्याने ५ हजार ३७३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ३ लाख ५४ हजार ७९७ इतकी झाली आहे.

दरम्यान, पुणे शहरातील ५ हजार ०४९ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ९४ हजार १७१ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात २३ हजार ५६४ नमुने घेण्यात आले आहेत. शहराची एकूण टेस्ट संख्या आता १८ लाख ३२ हजार १५७ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ५४ हजार ६२४ रुग्णांपैकी १,१९६ रुग्ण गंभीर तर ५,०४९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!