नागपूर: अतिवृष्टीमुळे जेव्हा नुकसान होते तेव्हा नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज पडत नाही. त्यामुळे पंचनामे होतच राहतील. अगोदर शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
तर राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीवर राज्य सरकारच्या भूमिकेवरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. राज्य सरकारच्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याही घोषणेची पूर्तता झालेली नाही. या घोषणा केवळ कागदावर राहिल्या आहेत. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याच नाहीत हे वास्तव आहे. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी आज शेतकरी असो किंवा समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मिरज दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता, सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- मुंबईतही होणार शाळा सुरु; महापालिका आयुक्तांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा
- आयपीएलमध्ये फक्त पन्नास रुपये गुंतवून सलूनवाला रातोरात झाला करोडपती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

