मुंबई – मुंबईत येत्या 4 ऑक्टोबरपासून इयत्ता 8 वी ते 12वी चे वर्ग प्रत्यक्ष सुरु करायला परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी काल मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळं त्यांनी 4 ऑक्टोबरपासून, कोविड-19 संबंधीचे सर्व नियम पाळून, 8 वी ते 12 वी चे प्रत्यक्ष शालेय वर्ग सुरु करायला परवानगी दिली आहे.
मुंबईतील सर्व माध्यमाचे, सर्व बोर्डाचे आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून नियमित भरणार आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक नियमांचे पालन करून शाळा उघडण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. मात्र पालकांचे संमतीपत्र असेल तरच विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.
दरम्यान, उर्वरित राज्यातील ग्रामीण भागातही येत्या 4 ऑक्टोबरपासून इयत्ता 5 वी ते 12वी च्या विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष उपस्थितीतले वर्ग तर शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे प्रत्यक्ष वर्ग सुरु होत आहेत. यासाठी राज्यातील यात शहरी आणि ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक वातावरण असून आरोग्याच्या संदर्भात शाळांना अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यासाठी मदत घेण्यासाठी टास्क फोर्सची आणि त्यासोबत पालक संघटना यांची मदत घेतली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मिरज दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता, सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
- ‘इथेच पाप केलं तर इथेच पापं भोगावी लागतील’, मनसेचा राष्ट्रवादीला टोला
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- ‘अपमान झालाय, आता काँग्रेसमध्ये राहणारच नाही’, अमरिंदर सिंग यांची घोषणा
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

