मुंबई – कोरोनाचे संकट आवासून उभे आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत शांततेने व साधेपणाने साजरे करा असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी रात्री ११ पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार खुले राहणार आहेत. मात्र रात्री ११ नंतर हे सर्व बंद होणार आहे. याचा अर्थ घराबाहेर जावून औषधे, जेवण, मित्राकडे जाणे यावर बंधन नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर बंधने आहेत.
जनतेने राज्यसरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे असे आवाहन करतानाच मोठ्या शहरातील जी हिलस्टेशन आहेत तिथेही हेच निर्बंध पाळण्याच्या सूचना त्या- त्या जिल्हापोलिस अधिक्षकांना दिल्या असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रिय एनसीबी, ती आली आहे आपण कधी कॉल कराल?’ सचिन सावंतांचा कंगनाला टोला
- राज्यातील तरूण वैफल्यग्रस्त, त्यामुळे तातडीने भरती प्रक्रिया सुरु करा; नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करा : नीलम गोऱ्हे
- शेतकरी आंदोलनावरून कुमार विश्वास यांनी साधला मोदि सरकारवर निशाणा
- आंदोलक शेतकऱ्यांशी आज चर्चेची सातवी फेरी; कृषी कायद्यांच्या तोडग्याकडे सर्वांचे लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

