Share

‘ईडीची नोटीस आली की महाविकास आघाडीचे नेते चिखलात ढकलुन दिल्यासारखं ओरडतात’

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. यानंतर, राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. जर कर नसेल तर डर कशाला? असा सवाल उपस्थित करत भाजपच्या नेत्यांनी त्यांना ईडी चौकशीला सामोरं जाण्याचं आव्हान दिलं आहे.

आता, भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी, ‘संजय राऊत यांना घटनाच मान्य नाही का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले, ‘अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी केंद्र सरकारची स्वायत्त संस्था असुन सहा वर्षात स्थापन झालेली नाही. वर्षानुवर्षे देशात कॉंग्रेसचं सरकार होतं त्या काळात पण ही संस्था होती आणि अशाच प्रकारचा वापर कॉंग्रेसने पण केलेला आहे. ईडीची नोटीस आली की महाराष्ट्रात विशेषत: सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते स्वत:चा भ्रष्टाचार झाकण्यासाठी नोटीसाला राजकिय रंग लावतात आणि चिखलात ढकलुन दिल्यासारखं ओरडतात.’

‘वास्तविक पाहता भाजपाचा ईडीचा कुठलाही संबंध नाही. मात्र लहान लेकरांच्या भुमिकेत ईडीच्या नावाने बोंबा राज्यात ठोकल्या जातात. गेल्या काही दिवसांपासुन शिवसेना नेते खासदार आणि संपादक संजय राऊत यांची जाहिर वक्तव्ये तपासुन पाहिल्यानंतर शब्दश: त्याचं संशोधन केल्यानंतर संपादक असलेल्या या माणसाला देशाची घटना मान्य नसावी या आविर्भावात त्यांचा चेहरा समोर येतो. लोकनियुक्त केंद्र सरकारला शिव्या घालतात, न्यायालयाने दिलेल्या निकालावरही ते आक्षेप घेतात, एवढेच नव्हे तर उचलली जीभ लावली टाळाला जणु काही कायदा माझ्यापुढे काहीच नाही मी सर्वश्रेष्ठ आहे हा आविर्भाव लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या संपादकाचा असेल तर महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी आणि नव्या पिढीतल्या पत्रकारांनी काय आदर्श घ्यावा याची चिंता वाटते.’ असा घणाघात देखील कुलकर्णीनी केला आहे.

‘स्वत:च्या पत्नीला नोटीस आली म्हणुन महिलांच्या पदराआड भाजप राजकारण करतय असं म्हणणाऱ्या संजय राऊतांनी चित्रपट अभिनेत्री कंगना रानावत यांच्याबाबत केलेली वक्तव्ये मनातल्या मनात चाळुन पाहिली तरी आत्मचिंतनासाठी विषय मिळु शकतो. राजकारणात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात. जसं पक्ष अनेक त्यांची विचार आणि तत्व अनेक तसंच पक्षात काम करणाऱ्या माणसाची रूपसुद्धा अनेक असतात.’

‘राज्यात आणि देशात संजय राऊत हे नाव अलीकडच्या काळात चर्चेत आहे. महाविकास आघाडी सरकारची निर्मिती करण्यात त्यांचा पुढाकार आणि भाजप-शिवसेना युतीला जनतेचा जनाधार मिळाल्यानंतर युती तोडण्यात त्यांचा असलेला सिंहाचा वाटा इथपासुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना केंद्रात युपीएचं चेअरमन बनवण्यापर्यंत त्यांनी घेतलेली झेप.एखादा पिक्चर चांगला चालल्यानंतर निर्मात्याची कॉलर टाईट होणे साहजिकच.त्याच आविर्भावात दुसरा काढलेला पिक्चर फ्लॉप होवु शकतो हा निसर्गाचा नियम आहे.’ असं देखील ते म्हणाले.

तर, ‘संजय राऊत सामना आणि इतर माध्यमात रोज दिसतात. त्यांचा स्वभाव मवाळ नाही. पण लोकांना कडक भाषेची माणसं आवडतात असा त्यांचा गैरसमज असावा. म्हणुन आपण काहीही फेकलं बाजारात विक्री होवु शकतं असं त्यांना वाटतं. मागच्या एक वर्षापासुन रात्रंदिवस ते भाजपावर तुटुन पडतात. बेताल वक्तव्येही करतात. राज्यातील सत्ताधाऱ्यांचे ते सल्लागार म्हणुन ओळखले जातात. राजकीय स्वार्थानी माणसं मोठी झाली. आपण काय करतो? याचा ताळमेळ त्यांना लागत नाही.’ असा टोला देखील राम कुलकर्णी यांनी संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!