भोपाळ : बहुमत चाचणीपूर्वीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पत्रकार परिषद घेऊन कमलनाथ यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार असल्याचं जाहीर केलं. मध्य प्रदेशात उद्भवलेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर काँग्रेस सरकार कोसळलं.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. याचा शेवट अखेर आज झाला. कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर आरोप करत राजीनामा देत असल्याची यांची माहिती दिली.
भाजपने काँग्रेसचे आमदार फोडले असल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला व राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. गेल्या काही दिवसांमध्ये मध्य प्रदेशातील काँग्रेस सराकारला ग्रहण लागले होते. काँग्रेसचे २० ते २२ आमदार अचानक राजीनामा देऊन गायब झाले होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर आरोप केले.
“१५ महिन्यात आम्ही ३० लाख शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ केलं. साडेसात लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दुसरा टप्पा सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यात दोन लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल. भाजपाने या सर्व शेतकऱ्यांसोबत विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला आहे,” असा आरोप कमलनाथ यांनी यावेळी केला. “आपण राज्याला माफियामुक्त केलं, त्यांच्या विरोधात मोहीम चालवली,” असंही ते म्हणाले.
पुढे बोलताना कमलनाथ म्हणाले, “भाजपला जनता माफ करणार नाही. 15 महिन्यात आम्ही प्रदेश माफिया मुक्त केला. भाजपला हे मान्य नव्हतं. 15 वर्षांच्या भाजपच्या कार्यकाळात काय झालं हे प्रत्येक नागरिकाला माहित आहे. राज्याच्या जनतेचा विश्वासघात झाला आहे. भाजपला 15 वर्ष मिळाली होती, मला केवळ 15 महिने मिळाले. अडीच महिने लोकसभा निवडणूक आणि आचारसंहितेत गेले. राज्याच्या प्रत्येक नागरिक साक्षीदार आहे की, मी जनतेच्या हिताचं कार्य केलं आहे. पण भाजपच्या हे पचनी पडलेलं नाही. त्यामुळे त्यांनी आमच्याविरोधात सातत्याने काम केलं.”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
