मुंबई: शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) रात्री गद्दाफी स्टेडियमवर खचाखच भरलेल्या लाहोरी प्रेक्षकांसमोर इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध एलिमिनेटर २च्या अंतिम ओव्हरमध्ये डेव्हिड विईसने सनसनाटी कामगिरी करून लाहोर कलंदरला सहा धावांनी विजय मिळवून दिला. लाहोरने चित्तथरारक रित्या विजय मिळवलेल्या या सामन्याने क्रिकेट रसिकांचे मन सुखावले आहे. तसेच या विजयासह लाहोर स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबादच्या (islamabad united) वकास मकसूदने टाकलेल्या शेवटच्या ओव्हरमध्ये २६ धावा दिल्याने वेईसने (david wiese) बॅटने खेळ वळवला. वकासने ओव्हरमध्ये वाइड मिळून २७ धावा दिल्या कारणाने कलंदर्सने सहा चेंडूंत १४१ सात बाद वरून १६८ धावा केल्या. ज्यात आठ चेंडूंत एक चौकार, तीन षटकारसह २८ धावा करत वेईस नाबाद राहिला. तर गोलंदाजी करताना जिंकण्यासाठी केवळ ३ चेंडूत ७ धावा बाकी असताना कलंदरच्या मोहम्मद वासिमने शेवटची विकेट घेत लाहोरला विजय मिळवून दिला. या चित्तथरारक सामन्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. केवळ पाकिस्तानी नव्हे तर भारतीय क्रिकेट रसिकांनाही हा सामना भावला आहे.
The ball that decided the fate of both teams. #HBLPSL7 l #LevelHai l #LQvIU pic.twitter.com/AbhfEZoPQ5
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 25, 2022
'WIESE' is all you could hear in the ground as the big man flaunted his firepower. #HBLPSL7 I #LevelHai I #LQvIU pic.twitter.com/JTHrBuFHVA
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 25, 2022
अब्दुल्ला आणि कामरान गुलाम यांच्यात तिसर्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करत कलंदर्सने झुंज दिली. अब्दुल्लाने लीगमध्ये पहिले अर्धशतक झळकावले. त्याने कलंदर्ससाठी २८ चेंडूत ५२ (चार चौकार, तीन षटकार) करत सर्वाधिक धावा केल्या. तर कामरानने २६ चेंडूत ३० (तीन चौकार, एक षटकार) धावांचे योगदान दिले. लाहोरचा संघ अंतिम सामन्यात मुलतान सुल्तान संघाशी भिडणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- माझीही राजकारणात आदित्यसारखीच सुरुवात- मुख्यमंत्री ठाकरे
- ‘अपघात होऊ नये म्हणून हे सिम्युलेटर वाहन…’; परिवहन मंत्र्यांची माहिती
- “मी बुमराहला गोलंदाजीसाठी लाच देण्याचा प्रयत्न केला”; भारतीय खेळाडूचा खुलासा
- “…तर आता तुमच्याही ‘डर्टी बारा’चे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही”, संजय राऊतांचा इशारा
- “…यावर भाजपवाले तोंड का उचकटत नाहीत?”, संजय राऊतांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

