Share

“…यावर भाजपवाले तोंड का उचकटत नाहीत?”, संजय राऊतांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या माझगावमधील निवासस्थानी काल (२५ फेब्रु.) पहाटेच ईडीने धाड टाकली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीपूर्वीच होत असलेल्या या कारवाईमुळे चर्चांना उधाण आले आहे. तसेच यावरून भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले असून विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांचे पथक पोहोचले. त्यांना जो तपास करायचा तो करतील, पण भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्यांना एक आठवण करून द्यायची आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजप स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना महापालिकेतच लाखो रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाली व आठवडाभर जेल भोगून ते पुन्हा स्थायी समितीचा पुढला भ्रष्टाचार करण्यासाठी रुजू झाले. यावर भाजपवाले तोंड का उचकटत नाहीत?’, असा सवाल राऊतांनी केला आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा थक्क करणाऱ्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील स्मार्ट सिटी घोटाळा ही जनतेच्या पैशांची लूट असून भाजपचेच लोक त्या लुटीचे भागीदार आहेत. नागपूर महापालिकाही या कामी मागे नाही. त्यामुळे भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी युद्धात पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील घोटाळय़ांचा समावेश आहे काय? किरीट व नील सोमय्या या पिता-पुत्रांनी राकेश वाधवानच्या मदतीने केलेला घोटाळा भविष्यात त्यांना तुरुंगात ढकलत नेणार आहे. कर नाही तर डर कशाला हे भाजपवाल्यांचे म्हणणे मान्य केले तर घामाघूम झालेले नील किरीट सोमय्या हे सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी का गेले आहेत?.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!