सातारा : शिवसेना या पक्षाविषयी निर्णय घेणे सर्वांसाठी थोडे अडचणीचे होते, परंतु भाजपातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष फोडून लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम सुरु केले होते. त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत हातमिळवणी केली. असा खुलासा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
सातारा येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालायात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात भाजपवर हल्लाबोल केला. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमधील अनेकांना कोंडीत पकडून, केसेसची भीती दाखवत पक्ष फोडला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. तर दुसरीकडे सांगली येथे झालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्र सरकारने या कायद्याबाबत चर्चा करायला पाहिजे होती पण नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पध्दत ‘हम करे सो कायदा’ अशी आहे. निर्बुद्धपणे निर्णय घेतले जात आहेत. मोदींचा हट्टीपणा सुरू आहे. तोच हट्टीपणा शेतीच्या कायद्याबाबत मोदी सरकारने केला. हे कायदे शेतकरी हिताचे नाहीत तर उद्योगपतींच्या हिताचे आहेत. असा घणाघात चव्हाण यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारकडून निर्बुद्धपणे निर्णय घेतले जात आहेत – पृथ्वीराज चव्हाण
- आज मशाली घेऊन मातोश्रीवर धडाडणार मराठ्यांचं भगव वादळ !
- नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला वसंतदादा पाटलांचे नाव देण्याची मागणी
- मंदिरे कधी उघडणार?; बाळासाहेब थोरातांनी दिली खूषखबर…
- मुख्यमंत्रीपद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिले – खडसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

