मुंबई : नऊ सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली; त्यामुळे ज्यांची नोकरी व शैक्षणिक प्रवेश अडचणीत सापडले, त्या युवकांमध्ये प्रचंड नैराश्य आले. तसेच हजारो मराठा विद्यार्थी-उमेदवार आत्महत्येच्या काठावर उभे आहेत. म्हणूनच या स्थगितीचा अन्वयार्थ लावणे आणि विविध पर्याय देणे क्रमप्राप्त आहे. यासाठी आता मराठा समाज कमालीचा आक्रमक झाला आहे.
त्यामुळेच आता मुंबईत मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च आज सायंकाळी 5 वजात मातोश्रीवर धडकणार आहे. मराठा आरक्षण लागू व्हावं, सुप्रिम केर्टात ते टिकावं, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज मशाल मार्चचं आयोजन केलं आहे. मात्र, मराठा क्रांती मोर्चा अजूनपर्यंत सर्व नियम पाळून, शांततेत झाला आहे. त्याप्रमाणेच आजचा मशाल मार्चही शांततेत काढण्यात येईल. मोर्चेकरी हे बांद्रा कलेक्टर कार्यालयाच्या समोरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात जमणार आहेत. मोर्चासाठी पूर्व तयारी म्हणून बैरिकेट्स आदिची व्यवस्था करण्यात आली आहे.
सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वांद्रे, खेरवाडी येथे पीडब्ल्यूडी ग्राऊंडमध्ये वाहने पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मोर्चेकर्त्यांच्या वतीने मातोश्रीवर माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
मुंबईच्या कलानगर इथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा मशाल मार्च पोहोचणार आहे. त्यामुळे मातोश्रीवरील पोलीस सकाळपासूनच सतर्क झाले आहेत. मातोश्रीच्या गेट नंबर-2, मागच्या गेटजवळ पोलिसांनी बॅरिकेटिंग केली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या इथे तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, वरिष्ट पोलिसांकडूनही गस्त घालण्याचं काम सातत्याने सुरु आहे.
अनेक मराठा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने त्यांनाही मुंबई पोलिसांनी 144 च्या नोटीस पाठवल्या आहेत. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंबेडकर चौकात 250 राज्य राखीव पोलीसांची तैनाती काल रात्रीपासूनच करण्यात आली आहे. तिथे सात गाड्या आणि 250 पोलीस चौकात दाखल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मंदिरे कधी उघडणार?; बाळासाहेब थोरातांनी दिली खूषखबर…
- मुख्यमंत्रीपद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिले – खडसे
- ‘अर्नबसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या भाजपच्या रक्तात आणि मेंदूत काहीतरी गडबड’
- नूपुर सॅनॉन करणार टायगर सोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण
- मोठी बातमी : शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याची आमदारकी धोक्यात ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

