🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कोरोना साथीचा प्रादुर्भाव राज्यात अद्यापही कायम असल्यामुळे राज्यातील मंदिरे अद्याप खुली करण्यात आली नाहीत. ह्या अगोदर महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपने राज्यात आंदोलन केले होते. परंतु आता मंदिरे सुरू करण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे.
नियमावली तयार होताच मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. काँग्रेसने कृषी कायद्यांच्या विरोधात सांगलीत ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी ना.थोरात बोलत होते.
ना.थोरात पुढे म्हणाले की, मंदिरे खुली करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे नियोजन करून निर्णय घेणे आवश्यक आहे. लवकरच याची घोषणा होईल. कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. महाविकास आघाडी सरकार काळजी घेत जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
राजकीय घडामोडींबद्दल ते म्हणाले की, संपूर्ण राज्यात आता वेगळे चित्र दिसणार आहे. काँग्रेसमध्ये प्रवेशाची एक लाट येत आहे. त्यामुळे पुन्हा काँग्रेसची ताकद राज्यात दिसेल. तसेच केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांना वेगवेगळ्या राज्यांतून विरोध होत आहे.
पंजाब, राजस्थानसारख्या राज्यांनी केंद्राच्या कायद्यांना डावलून नवे कृषी कायदे लागू केले आहेत. ह्या सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो. भाजपाला शेतकऱ्यांची जिरवायची आहे. त्यामुळे परदेशातून शेती माल आयात करण्यात येत आहे, अशी घणाघाती टीका ना.थोरात यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानपेक्षा भाजपला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो; बाळासाहेब थोरातांची भाजपवर जहरी टीका!
- आदिवासी भागातील बालकांना कुपोषणापासून दूर ठेवण्यासाठी लढतेय ही तरुण अधिकारी!
- कोरोना संकटकाळात १ लाख १५ हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार – नवाब मलिक
- यंदाच्या दिवाळीत रितेश-जेनेलिया घेऊन येत आहेत जनसामान्यांसाठी ‘आशेची रोषणाई’…
- तरुणाईमध्ये उत्सूकता निर्माण करणारी Royal Enfield ‘Meteor 350’ अखेर भारतात देखील लाँच !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

