जळगाव : भाजपला राम राम ठोकल्यानंतर आता एकनाथ खडसे चांगलेच आक्रमक झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या खडसे यांनी हाती घेतल्याचे दिसून येत आहे.
मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं. गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले असंही म्हणत खडसेंनी भाजपवर टीका केली आहे.ते मुक्ताईनगर इथं बोलत होते.
फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपमधल्या एका व्यक्तीने मला छळलं अशी खंत देखील एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवली.भाजपाने एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. मला या पक्षातून छळ करत ढकलण्यात आलं. TV9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
‘मला अक्कल शिकायला चालले होते. मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पार्टीला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसाने छेळलं.’ असं म्हणत खडसेंनी देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानपेक्षा भाजपला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो; बाळासाहेब थोरातांची भाजपवर जहरी टीका!
- आदिवासी भागातील बालकांना कुपोषणापासून दूर ठेवण्यासाठी लढतेय ही तरुण अधिकारी!
- कोरोना संकटकाळात १ लाख १५ हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार – नवाब मलिक
- यंदाच्या दिवाळीत रितेश-जेनेलिया घेऊन येत आहेत जनसामान्यांसाठी ‘आशेची रोषणाई’…
- तरुणाईमध्ये उत्सूकता निर्माण करणारी Royal Enfield ‘Meteor 350’ अखेर भारतात देखील लाँच !


