मुंबई- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात विना अनुदान तत्वावर वैद्यकीय महाविद्यालये व अभियांत्रिकी महाविद्यालयांना परवानगी देऊन शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली.
दरम्यान,1977 ते 1985 या कालखंडात दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा जनतेच्या मनातील ख-या अर्थाने ‘दादा’ होते. दादांनी आपल्या काळात महाराष्ट्राला एक संस्थात्मक राज्य बनविले. सहकार क्षेत्रात आज महाराष्ट्र जो काही त्यांत वसंतदादांचे मोठे योगदान आहे. पाणी आडवा पाणी जिरवा हा मंत्र वसंतदादांनीच दिला. दादांचे शिक्षण कमी होते पण महाराष्ट्रातील खेडोपाड्यात शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक शिक्षणसंस्था काढण्याचा मार्ग त्यांनीच दाखवला.
या थोर नेत्याचे नाव नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा लोकनेते सहकार महर्षी वसंतरावदादा पाटील सोशल फ्रंटचे अध्यक्ष यशवंत हाप्पे यांनी केली आहे.
हाप्पे यांनी यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात ते पुढे म्हणतात की, सुधाकरराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री असताना वसंतदादा पाटील यांचा जयंती दिन हा सहकार दिन म्हणून शासनातर्फे साजरा करण्याचा अध्यादेश काढला होता त्याप्रमाणे तो दरवर्षी साजराही होत होता परंतु मध्यंतरीच्या काळात त्यात खंड पडला आहे तो परत सुरु करावा अशी मागणीही हाप्पे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्रीपद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिले – खडसे
- आदिवासी भागातील बालकांना कुपोषणापासून दूर ठेवण्यासाठी लढतेय ही तरुण अधिकारी!
- कोरोना संकटकाळात १ लाख १५ हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार – नवाब मलिक
- यंदाच्या दिवाळीत रितेश-जेनेलिया घेऊन येत आहेत जनसामान्यांसाठी ‘आशेची रोषणाई’…
- तरुणाईमध्ये उत्सूकता निर्माण करणारी Royal Enfield ‘Meteor 350’ अखेर भारतात देखील लाँच !


