🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनानं पुन्हा एकदा काही कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली. ज्याअंतर्गत राज्यात ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. यासोबतच प्रवासावरील निर्बंधही अधिक कडक करण्यात आले. याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे. अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई पासची आवश्यकता लागणार आहे.
नागरिकांना काही महत्त्वच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई- पास काढावा लागणार आहे. काही महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यासच नागरिकांनी ई- पासचा वापर करावा असं आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे. ई- पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम, https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही. कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो. ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा अॅक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी सदर प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी. जिथं त्यांची मदत केली जाईल असे पोलीस प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
औरंगाबाद शहर पोलीस सक्षम
औरंगाबाद पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ एकचे उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील यांच्या कार्यक्षेत्रात सिटी चौक, क्रांती चौक, वेदांतनगर, बेगमपुरा, छावणी, वाळूज, एम वाळूज आणि दौलताबाद पोलीस ठाणे येतात. त्यासाठी एका उपनिरीक्षासह तिघांची पासेस सुविधेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. संपर्क ०२४०-२२४०५०३ तर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांच्या कार्यक्षेत्रात सिडको, एम सिडको, जिन्सी, हर्सूल, मुकुंदवाडी, जवाहरनगर, पुंडलीकनगर, सातारा आणि उस्मानपुरा पोलीस ठाणे येतात. याठिकाणी देखील पोलीस उपनिरीक्षकच्या अधिपत्याखाली दोन कर्मचारी नियुक्त आहेत. नागरिकांनी पासेस संबंधी अडचण येत असेल तर ०२४०-२२४०५९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
महत्वाच्या बातम्या
- बर्थ डे स्पेशल; ‘शिवाजी पार्क ते वानखेडे’ सचिनचा २२ यार्डचा प्रवास बनला ३ पिढ्यांचे प्रेरणास्थान
- निराश कर्णधार रोहितने मधल्या फळीवर फोडले पराभवाचे खापर
- सलग तीन पराभवानंतर पंजाबची गाडी विजयी ट्र्रॅकवर, ९ गडी राखुन मुंबईचा केला पराभव
- ऑक्सिजन प्लांटसाठी परभणी जिल्हाधिकारी यांची समिती वैद्यकीय सुविधांवर लक्ष देणार
- मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
