परभणी : कोविडसाठी लागणारी जिल्हास्तरावरील तातडीची खरेदी ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ही समिती आरोग्य सुविधा तसेच औषधोपचार या बाबत लक्ष ठेवून असणार आहे. तसेच रुग्णालयांच्या समस्येनुसार त्यांच्या समस्यांचे निराकरण देखील करण्यासाठी काम करणार आहे.
ही समिती आता ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती, उपाययोजना तसेच जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, जिल्हा नियोजन निधी, राज्य आपत्ती निवारण निधी व इतर जिल्हास्तरीय उपलब्ध निधीतून कोविड रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट बसवण्यास मान्यता देण्याचा शासनाचा विचार होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा होणारा तुटवडा काही प्रमाणात कमी होण्यास मदत देखील होणार आहे.
महाराष्ट्रात कोराना संसर्गाच्या वाढत्या कहरामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. फेब्रुवारीपासून राज्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण खुपच झपाट्याने वाढत चालले आहेत. दोन दिवसांपासून राज्यात ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटीव्ह आढळत आहेत. कोरोना रुग्णांना खासगी तसेच सरकारी दवाखान्यामध्ये उपचार करताना ऑक्सिजनची गरज भासत आहे. दरम्यान कोरोना रुग्णांची वाढती संख्या, उत्पादन होणारा ऑक्सिजन, या स्थितीत वैद्यकीय वापरासाठी लागणारा ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा वैद्यकीय ऑक्सिजन लक्षात घेता, नवीन ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणी तातडीने करणे आवश्यक असल्याचे यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकतेच आदेश देखील काढलेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची टंचाई, मात्र ५०० ऑक्सिजन बेड रिकामे!
- मराठा आंदोलनाला मोठे यश, ‘या’ चार मागण्या झाल्या मान्य!
- ‘आता लस देताना मोदी रडतायत; जुमलेबाजीवर सरकार टिकत नाही, सत्ताजीवी भाजपने लक्षात ठेवावं’
- प्रशासनाची काॅन्टॅक्ट हिस्ट्री तपासणीकडे डाेळेझाक; उस्मानाबादेत काेराेना स्प्रेडर फिरताहेत खुलेआम
- ‘भाजप नेते लोकांच्या मृतदेहावर उभे राहून पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

