चेन्नई : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखुन दणदणीत पराभव केला. सलग तीन पराभव स्विकारल्यानंतर पंजाबने हा विजय मिळवला आहे. तर मुंबईचा हा सलग दुसरा तर स्पर्धेतील तिसरा पराभव ठरला आहे. शानदार अर्धशतकासाठी पंजाब संघाचा कर्णधार के एल राहुल याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
पंजाबने नाणेफेक जिंकल्यांनतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वाना आश्चर्य वाटले, कारण चेन्नईच्या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणे सोपो नव्हते. मात्र कर्णधार राहुलचा विश्वास सार्थ ठरवत दुसऱ्याच षटकात सलामीवीर डीकॉकला(३) बाद करुन पंजाबला पहिले यश मिळवुन दिले. यानंतर पंजाबच्या गोलंदाजानी मुंबईच्या फलंदाजाना जखडुन ठेवले. पॉवरप्लेमध्ये मुंबईचा संघ केवळ २१ धावा करु शकला. इशान किशन (६) धावावर बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित(६३) आणि सुर्यकुमार यादव(३३) यांनी संघाचा डाव सावरला. दोघांव्यतिरीक्त इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. निर्धारित २० षटकात मुंबईने १३१ धावांपर्यंत मजल मारली. पंजाबकडुन शमी आणि बिश्नोई दोघांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
मुंबईने दिलेल्या १३१ धावांचा पाठलाग करताना पंजाबने सुरुवातीपासुन सावध पण आक्रमक धोरण अवलंबले. कर्णधार के एल राहुल(६०) आणि मंयक अग्रवाल(२५) यांनी संघाला अर्धशतकी सलामी दिली. मंयक बाद झाल्यावर पुन्हा मुंबई पुनरागमन करेल असे वाटत होते. मात्र के एल राहुल आणि ख्रिस गेल(४३) यांनी अधिक पडझड न होउ देता. आठराव्या षटकात ९ गडी राखुन विजय संपादन केला. के एल राहुलने सर्वाधिक ५२ चेंडुत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६० धावांची खेळी केली. तर ख्रिस गेलने ३५ चेंडुत ५ चौकार आणि २ षटकारासह ४३ धावांची खेळी केली. ६० धावांची नाबाद खेळी करणाऱ्या के एल राहुलला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- ऑक्सिजन प्लांटसाठी परभणी जिल्हाधिकारी यांची समिती वैद्यकीय सुविधांवर लक्ष देणार
- मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता !
- कोरोना चाचणीत औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक
- ‘शाहरूख खान राम मंदिराच्या मध्यस्थीसाठी तयार होता!’
- डीसीएचसीने लवकर ऑक्सिजनचा प्लांट सुरु करावा : मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

