🕒 1 min read
चेन्नई : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखुन दणदणीत पराभव केला. सलग तीन पराभव स्विकारल्यानंतर पंजाबने हा विजय मिळवला आहे. तर मुंबईचा हा सलग दुसरा तर स्पर्धेतील तिसरा पराभव ठरला आहे. शानदार अर्धशतकासाठी पंजाब संघाचा कर्णधार के एल राहुल याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकात केवळ १३१ धावांचा पल्ला गाठला. यात कर्णधार रोहित आणि सुर्यकुमार यादव यांनी ७९ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या दोघाव्यतिरीक्त मुंबईचा सलामीवीर डिकॉक(३), इशान किशन(६), पोलार्ड(१६), हार्दिक(१) आणि कृणाल(३) हे फलंदाज अपयशी ठरले. सामन्यानंतर या पराभवाला मधल्या फळीतील फलंदाज जबाबदार आसल्याचा ठपका रोहितने ठेवला. रोहित म्हणाला ‘ही खेळपट्टी फलंदाजीसाठी वाईट नाही, पंजाबच्या संघाने फलंदाजी करुन ते सिद्ध करुन दाखवले. आमचा संघ या सामन्यात जास्त धाव करण्यात अपयशी ठरला.’ असे तो म्हणाला.
या खेळपट्टीवर १५०-१६० धावा विजयासाठी पुरेशा आहेत. मात्र मागील दोन्ही सामन्यात मुंबई ही धावसंख्या उभी करण्यास असमर्थ राहिली. तसेच या सामन्यात मुंबईच्या फलंदाजानी पॉवरप्लेमध्ये केवळ २१ धावा केल्या तर डीकॉकचा बळी गमावला. मागील सामन्यात पॉवरप्लेमध्ये मुंबईची फलंदाजी चांगली झाली होती.
महत्वाच्या बातम्या
- सलग तीन पराभवानंतर पंजाबची गाडी विजयी ट्र्रॅकवर, ९ गडी राखुन मुंबईचा केला पराभव
- ऑक्सिजन प्लांटसाठी परभणी जिल्हाधिकारी यांची समिती वैद्यकीय सुविधांवर लक्ष देणार
- मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता !
- कोरोना चाचणीत औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक
- ‘शाहरूख खान राम मंदिराच्या मध्यस्थीसाठी तयार होता!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
