मुंबई : सचिन तेंडुलकर भारतातच नव्हे तर जगातील सर्वोउत्कृष्ठ खेळाडूंपैकी एक खेळाडू मानला जातो. आज सचिन त्याचा 48वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. इ.स. 2002 मध्ये आपल्या कारकीर्दीच्या बाराव्या वर्षीच, विस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्व कालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिव रिचर्ड्स याच्यानंतरचा दुसरा सर्व कालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांनची निवड केली होती.
2011 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. इ.स. 2003 मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. 20नोव्हेंबर 2009 रोजी त्याने कारकीर्दीतील 30,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानले जाते.
पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारांनी तो सन्मानित आहे. सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. हा सन्मान त्यांना त्याच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. भारतीय वायुसेना दलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळालेला तो पहिले खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेले पहिले व्यक्ती आहेत. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिनला मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. 6 नोव्हेंबर 2012 रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- ऑक्सिजन प्लांटसाठी परभणी जिल्हाधिकारी यांची समिती वैद्यकीय सुविधांवर लक्ष देणार
- मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता !
- कोरोना चाचणीत औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक
- ‘शाहरूख खान राम मंदिराच्या मध्यस्थीसाठी तयार होता!’
- डीसीएचसीने लवकर ऑक्सिजनचा प्लांट सुरु करावा : मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
