Share

बांगलादेश मधील हिंदूंना सुरक्षा प्रदान करा; शिवसेनेसह इस्कॉनची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी!

Published On: 

औरंगाबाद : मागील सलग १२ दिवसांपासून बांगलादेश मधील हिंदू अल्पसंख्यांवर प्राणघातक हल्ले सुरु असून, इस्कॉनच्या नौखाली मंदिराची तोडफोड करण्यात आली. तसेच अनेक दुर्गा पंडाल नष्ट करण्यात आलेत. इस्कॉनच्या तीन सदस्यांची व अनेक हिंदूची हत्या करण्यात आली. शेकडो जण जखमी झालेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इस्कॉनच्या वतीने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

बांग्लादेश याठिकाणी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून मारण्यात आले. अशा प्रकारचे हल्ले अनेक दशकांपासून हिंदू व अन्य अल्पसंख्यकांवर सुरू आहेत. या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ व समस्त हिंदू संघटनांचे सदस्य तसेच समस्त हिंदू प्रेमींनी याबाबत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे, १५० हून अधिक देशातील ७५० इस्कॉन केंद्रामधून वरील घटनेचा निषेध म्हणून शांततापूर्ण मार्गाने विरोध प्रदर्शन होत आहेत.

भारत सरकारचे संवैधानिक प्रतिनिधी म्हणून आपण आमच्या मागण्या सरकारकडे पोहचवाव्यात. वरील सर्व अमानवीय कृत्यांतील दोषोंना कठोर कायदेशीर शिक्षा व्हावी, हिंदू तसेच अन्य अल्पसंख्यकांना व त्यांच्या प्रार्थनास्थळांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे माजी महापौर नंदकुमार घोडेले, इस्कॉनच्या वतीने डॉ. रोहिणीप्रिय दास, डॉ. रमेश लड्डा, अॅड. माधव गुडे आदींसह भाविक उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!