मुंबई : देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. कोरोनाच्या महामारीमुळे देशभरातील असंख्य कुटुंबे पोरकी झाली आहेत. अनेक लहान मुले अनाथ झाली आहेत. अशातच, कडक निर्बंध, टाळेबंदी, व्यवसायांमधील मंदी यामुळे लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न आणि अशातच पाल्यांच्या शाळांकडून फी ची मागणी याने आर्थिक विवंचनेत भर पडली आहे.
देशभरात आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त व्यक्तींनी कोरोनामुळे जीव गमावलेला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एक मोठी मागणी केलेली आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विनंती केली आहे. कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही पालक म्हणजेच आई-वडील किंवा त्या घरातील कमावत्या पालकाचे निधन झाले आहे. त्यांना आपण नवोदय विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण द्यावं, याद्वारे आपण देश म्हणून सध्या त्यांच्यावर आलेल्या दुःखद प्रसंगात आशेचा किरण निर्माण करू शकू असं सोनिया गांधी म्हणाल्या. त्यासोबतच यामुळे आपण त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी देखील प्रयत्न करू शकतो असं सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवले आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला आहे. ‘ज्या लहान मुलांचे आई आणि वडील दोघांचेही कोरोनाने निधन झाले आहे किंवा एकाचा आधीच मृत्यू झाला असेल आणि एकाचा कोरोनाने मृत्यू झाला तर त्यांना महिन्याला अडीच हजार रुपये पेन्शन मिळेल. ही पेन्शन ती मुलं 25 वर्षांची होईपर्यंत देण्यात येईल. यासोबतच मुलांना मोफत शिक्षणही देण्यात येणार असल्याचं,’ अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान महाराष्ट्राला दीड हजार कोटींची मदत जाहीर करतील; राऊतांचा टोला
- मोठी बातमी! केंद्राकडून ‘म्युकरमायकोसिस’चा साथरोग कायद्यात समावेश, नवीन नियम लागू
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा म्हणजे लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंची टीका
- ‘आम्हाला बोलू दिले नाही तर मग बोलवलं कशाला?’, ममता पंतप्रधान मोदींवर भडकल्या
- ‘जलयुक्त शिवारात’ बोगसगिरी, सेवानिवृत्त विभागीय कृषी सहसंचालकासह ६ जणांवर परळीत गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

