Share

वानखेडेंवर तुम्ही केलेले आरोप खरे आहेत हे सिद्ध करा; हायकोर्टाचे नवाब मलिकांना निर्देश

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांवरून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी म्हणजेच ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. आज या प्रकरणातील पुढील सुनावणी झाली. यावेळी कोर्टानं दोघांनाही अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मलिक हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी केलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करणारी कागदपत्र सादर करा असे आदेश ज्ञानदेव वानखेडे यांना कोर्टानं दिले आहेत. तर मलिकांनी केलेले आरोप खरे आहेत हे सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

मलिक यांनी प्रेस रिलीज, मुलाखती आणि समाजमाध्यमांद्वारे वानखेडे कुटुंबियांवर केलेल्या टिप्पण्या छळवणूक करणाऱ्या व बदनामीकारक असल्याचे जाहीर करावे आणि त्यापोटी १.२५ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती ज्ञानदेव वानखेडे यांनी दाव्यात केली आहे. यावर आज पूर्व परवानगीशिवाय दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्याची विनंती मलिकांनी हायकोर्टाकडे केली. त्यावर आज सुनावणी पार पडली असून समीर वानखेडे यांच्याविरोधात ट्विटवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळलीत का? असा सवाल विचारत नवाब मलिक यांना अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

‘नवाब मलिक हे एका राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते आणि जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनी जे काही ट्विट्स केले, त्याविषयीच्या कागदपत्रांची सत्यता आधी तपासून घेतली होती का? कारण शासकीय सेवक असलेल्या समीर वानखेडे यांच्याविषयी ते व्यक्तिगत काही बोलत असतील तर ते त्यांचे वडील म्हणून ज्ञानदेव वानखेडे यांच्यावर परिणाम करणारे ठरू शकतात. समीर वानखेडे हे शासकीय सेवक असल्याने त्यांच्याविरोधात बोलता येणार नाही अशी बंदी घालण्याचा आदेश आम्ही देऊ शकत नाही. पण इतर सर्व गोष्टींविषयी बोलताना मलिक यांनी कागदपत्रांची सत्यता आधी तपासली होती का, हे न्यायालयाला पहायचे आहे,’ असे नमूद केले.

तसेच ‘समीर वानखेडे यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात अनेक ट्विट करताना ज्या कागदपत्रांचा तुम्ही आधार घेतला, त्यांच्या सत्यतेविषयी खातरजमा करून तुम्ही त्यांचा वापर केला, असे सांगणारे प्रतिज्ञापत्र शुक्रवारपर्यंत दाखल करा,’ असे निर्देश कोर्टाने दिले.

समीर वानखेडेंसोबत वाद असताना, त्यांची बहीण, मेहुणीवर आरोप करण्याचं कारण काय?, यासंदर्भात आम्ही कायदेशीर नोटीसही पाठवली आहे असा वानखेडेंनी हायकोर्टात दावा केला. त्यावर तुम्ही या घडीला केवळ होत असलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करा, तुमचा मुलगा एक सरकारी कर्मचारी आहे, तेव्हा सवाल उठणारच असे हायकोर्ट म्हणाले. ‘नवाब मलिक यांनी केलेले ट्विट्स खोटे असतील तर तसे स्पष्ट करणारे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र शुक्रवारपर्यंत दाखल करा,’ अशा सूचना कोर्टानेज्ञानदेव वानखेडे यांना दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!