Share

अभिमानास्पद : महाराष्ट्राने केला लसीकरणाचा राष्ट्रीय विक्रम

Published On: 

मुंबई : राज्यात  १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. गेल्या तीन महिन्यात लसीकरण मोहिमेमध्ये देशात महाराष्ट्राची कामगिरी विक्रमी राहीली आहे. प्रत्येक दिवशी आधीच्या विक्रमी कामगिरीपेक्षा सरस कामाची नोंद होत आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना लसीकरण वेगानं सुरु आहे. कोरोना लसीकरणाची मोहिम राबवण्यात येत आहे. लसीकरणात महाराष्ट्र राज्यानं विक्रमी नोंद केली आहे. महाराष्ट्रात शनिवारी 8 लाख कोरोनाचे डोस देण्यात आले. महाराष्ट्रात शनिवारी 8 लाख 1 हजार 847 कोरोना लसीचे डोस देण्यात आले. राज्यानं यापूर्वीचा दैनंदिन रेकॉर्ड ब्रेक केला आहे. अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली आहे.

शनिवारी रात्रीपर्यंत राज्यात एकूण डोसची संख्या 3.39 कोटी होती. आम्ही कोविड लसीकरणात रेकॉर्ड ब्रेक केल्याचं व्यास यांनी सांगितलं आहे. याआधी सर्वोत्तम दैनंदिन रेकॉर्ड 26 जून रोजी नोंदवण्यात आला. 26 जून रोजी राज्यात 7 लाख 38 हजार 704 कोरोना लसीचे डोस देण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून लसीकरण मोहिमेमध्ये राज्य सातत्याने सर्वोच्च स्थानावर असल्याचं, डॉ. व्यास यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!