परभणी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने 14 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी दुपारी राज्यामध्ये वाढणाऱ्या कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता स्थगित केल्या. त्या निषेधार्थ एमपीएसस्सी तयारी करणारे तसेच परिक्षार्थ्यांनी गुरुवारी सायंकाळी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून जोरदार निदर्शने करत सरकारविरोधी घोषणा देखील दिल्या.
दरम्यान एमपीएससी च्या विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयातून हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर शहरासह जिल्हाभरातील विद्यार्थ्यी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र यायला सुरुवात झाली. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. या वेळी विद्यार्थी म्हणाले की, सरकारला लग्न, समारंभ, अधिवेशन चालते. परंतू एमपीएससी परिक्षा घेणे का चालत नाही. तर सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
या वेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एमपीएससीच्या परिक्षा पुढे ठकलल्या बाबत घेतलेली भूमिका ही विद्यार्थ्यांना आवडलेली नाही. हा एकप्रकारे विद्यार्थ्यांवर केलेला अन्याय देखील आहे. अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया या वेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. तर विद्यार्थ्यांच्या या अचानक केलेल्या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासनातील अधिकारी देखील गांगरुन गेले. हे विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल दोन तास ठाण मांडून बसले होते. दरम्यान शहरातील वसमत रोड, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, गांधी पार्ककडून येणारी वाहतूक ठप्प झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- कन्नड भाषेत फलक दिसल्यास दुकान बंद करणार, शिवसेनेचा इशारा
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

