Share

सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलकांनी चक्क महामार्गावर पक्की घरे बांधायला सुरुवात केली

Published On: 

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचा संघर्ष अजून देखील सुरु आहे. तीन महिने उलटून देखील आंदोलक शेतकरी हे दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून आहेत. २६ जानेवारी रोजी झालेल्या गोंधळानंतर या आंदोलनावरून नवं वादंग निर्माण झालं आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेलं भाष्य यावर देशातील काही दिग्गज कलाकारांनी व क्रिकेटर्सनी दिलेलं उत्तर, टूलकिट प्रकरण यामुळे या आंदोलनाने वेगळं वळण घेतल्याचं दिसून येत आहे.

शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असून, केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे त्यांना मान्य नसून, ते रद्द करण्याची त्यांची मागणी कायम आहे. एका बाजूला हे सुरु असताना आता सिंघू बॉर्डरवर एनएचएआयच्या प्रकल्प संचालकांनी शेतकरी आंदोलकांनी महामार्गावर पक्की घरे बांधायला सुरुवात करून रस्ता खराब केल्याचा दावा करत खटला दाखल केला आहे.

विशेष म्हणजे परवानगी न घेता सार्वजनिक मालमत्ता असलेल्या ठिकाणी बोअरवेल घेतला असल्याची माहिती देखील समोर आली असून यासाठी नगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. सध्या पोलिसांनी बांधकाम आणि बोअरवेलचे काम थांबविले आहे.

एनएचएआयचे प्रकल्प संचालक आनंद कुमार यांनी कुंडली पोलिस स्टेशनला सांगितले की कुंडली गावाजवळ असलेल्या कार कंपनीसमोर काही लोकांनी महामार्गावर बेकायदा बांधकाम सुरू केले आहे. शेतकर्‍यांनी विटांनी महामार्गावर पक्की घरे बांधण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मोठ्याप्रमाणावर महामार्गाचेही नुकसान केले आहे. त्यांनी पोलिस पथकाला या बेकायदेशीर बांधकामांचे छायाचित्रेदेखील उपलब्ध करुन दिली आहेत, त्यावर कुंडली पोलिस ठाण्यात कलम 283, 431,8बी नॅशनल हाईवे एक्ट-1956 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान,महामार्गालगत केएफसी समोरील रिकाम्या जागेवर शेतकऱ्यांनी  बोरवेलचे बेकायदेशीर काम सुरु असल्याची देखील तक्रार कुंडली नगरपालिका सचिव पवन कुमार यांनी कुंडली पोलिस ठाण्यात दिली आहे. या कामासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे सांगत पंजाबमधील शेतकरी कर्म सिंहविरूद्ध तक्रार दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!