Share

ममता बॅनर्जींची उमेदवारी रद्द होणार? शपथपत्रात गुन्हे लपवल्याचा भाजपचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडताना पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात काही गुन्हे लपवल्याचा आरोप भाजपाने केलाय. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी भाजपाने केली आहे.

नंदीग्राममधील हल्ल्यात जखमी झालेल्या आणि पायात प्लॅस्टर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण येत्या काही दिवसांतच पुन्हा प्रचारात सहभागी झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवरून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. ममत बॅनर्जी व्हीलचेअरवरून कोलकताच्या गांधी मूर्तिजवळ पोहोचल्या होत्या. त्यानंतर गांधी मूर्तिपासून हाजरापर्यत ‘रोड शो केला.

अशातच, नंदीग्राममधील भाजपचे उमेदवार शुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप केलाय. ममता बॅनर्जी यांनी उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रावर त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केला नसल्याचं अधिकारी यांनी म्हटलंय. तसंच ममता यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणीही त्यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.

शुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर गुन्हे लपवल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा हवाला देत त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, ‘ममता बॅनर्जी यांच्याविरोधात 6 गंभीर गुन्हे प्रलंबित आहेत. त्यातील 5 आसाममध्ये तर 1 सीबीआयच्या अधीन आहे. मात्र त्यांनी दिलेल्या शपथपत्रात त्याचा उल्लेख केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जर एखादा उमेदवार त्याच्याविरोधातील गुन्हे लपवत असेल तर त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. या आधारावर ममता यांची उमेदवारी रद्द केली जावी,’ अशी मागणी अधिकारी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!