🕒 1 min read
औरंगाबाद : पुरोगामी विचाराच्या बाता मारून मनुवादाचे जतन करणाऱ्या काँग्रेस- राष्ट्रवादी किंवा तत्सम राजकीय पक्षाचा बुरखा फाडण्यासाठी आता वंचित समुहातुन येणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांनी समोर यायला हवे. त्यांच्या सहकार्यानेच वंचितांना सत्ता मिळू शकते. फुले-आंबेडकर विद्वतसभा या संघटनेच्या महाराष्ट्रातील विभागीय समन्वयकांची चिंतन बैठक रविवारी (दि.८) औरंगाबादमध्ये पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या वंचित बहुजनच्या प्रभारी अध्यक्ष रेखा ठाकूर बोलत होत्या.
रेखा ठाकूर म्हणाल्या, महाराष्ट्रात प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून सर्वसामान्य माणसाला सत्तेत पोहचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षम पर्याय म्हणून आज काम करत आहे. निवडणुका येतील जातील पण सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर वंचित अतिशय चोखपणे लोकशाहीच्या मार्गाने लढत असुन या प्रश्नांना वाचा फोडत आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात येत्या काळात वंचितांना सत्येत घेऊन जाण्याचा निश्चय केला आहे. निर्धार पूर्ण करायचा असेल तर महाराष्ट्रातील कानाकोप-यात समाजातील विशिष्ट स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बुद्धिजीवी वर्गाने वंचितच्या सोबत उभे राहावे.
आता या विद्वत सभेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. घराणेशाहीचा कचाट्यात सापडलेल्या शिक्षणसंस्था त्यातून पसरविल्या जाणारा बनावट पुरोगामी विचार हा कधीच सर्वसामान्यांना शिक्षण, रोजगार, व सन्मानाची संधी उपलब्ध करून देऊ शकणार नाही. बुद्धीजीवी वर्गाने वैचारिक व दिशादर्शक चळवळ वंचितांसाठी उभी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी सहकार्य केल्यास आपण सत्तेत जाऊ, असे मत रेखा ठाकुर यांनी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढविणार, खासदार संजय जाधव यांचे विधान
- नीरज चोप्राप्रमाणेच राखी सावंतने फेकला भाला ; पाहा ‘हा’ भन्नाट व्हिडीओ
- शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईला अटक होण्याची शक्यता
- भारतीय संघाला पहिल्या टेस्टपासून मिळेल ‘हा’ फायदा : दिनेश कार्तिक
- अनोखा उपक्रम! मुलाच्या लग्नाचा खर्च टाळत नागरिकांचे मोफत लसीकरण,आमदार गणपत गायकवाड यांचा पुढाकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
