Share

महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार ! फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट

Published On: 

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वाधिक आमदार असून देखील भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं असून त्यांनी महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही. आता पावसाळी अधिवेशन तोंडावर आलं असून राज्यातील विविध प्रश्नांवरून सरकारला घेरण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.

सरकारने कोरोनाचं कारण पुढे करून केवळ ५ व ६ जुलै रोजी २ दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचं ठरवलं आहे. याआधी आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला राजभवनावर गेले होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या चुकांचा पाढा वाचला असून आता या सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्षपद रिक्त असताना आता हे दुसरं अधिवेशन होणार आहे. मात्र, सरकारने तातडीने विधानसभा अध्यक्ष ठरवणे व त्यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पाडणे अशी संवैधानिक तरतूद आहे. मात्र, हे सरकार नियमांना तिलांजली देत आहे, ही बाब प्रामुख्याने फडणवीसांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

यासोबतच, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली असतानाच ५ जिल्हा परिषदा व ३३ पंचायत समित्यांची पोटनिवडणूक जाहीर करून ओबीसी समाजाचं नुकसान केलं जातंय, कोरोनाच कारण देऊन जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी अधिवेशन कमी कालावधीचं घेतलं जातंय, शेतकऱ्यांची वीज तोडण्याचं पाप हे सरकार करत आहे, असे आरोप फडणवीसांनी केले आहेत. राज्यपाल आता काय भूमिका घेणार हे महत्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!