नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना दरम्यान रविवारी या आंदोलनाला उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी भागात हिंसक वळण मिळालं. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मंत्रीपुत्र आशिष मिश्रा यानं आंदोलकांना आपल्या गाडीखाली चिरडल्याचा आरोप करण्यात येतोय. या हिंसेत चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले आहेत. यानंतर दोषींना अटक करण्यात यावी, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या घटनेमुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी देशभरात तीव्र आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
लखीमपूरला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांची पुन्हा एकदा उत्तर प्रदेश पोलिसांशी बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतलंय. ‘हॅलो सीओ साहेब, ऑर्डर कुठंय? ऑर्डर काढा’ असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी पोलिसांना विचारला. मात्र, यानंतर उत्तर पोलिसांकडून प्रियांका यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
लखीमपूरला जाणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांकडून रोखण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या बहिणीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. ‘प्रियांका मला माहीत आहे की तू मागे फिरणार नाहीस. ते तुझ्या हिंमतीला घाबरले आहेत’ असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
प्रियंका, मैं जानता हूँ तुम पीछे नहीं हटोगी- तुम्हारी हिम्मत से वे डर गए हैं।
न्याय की इस अहिंसक लड़ाई में हम देश के अन्नदाता को जिता कर रहेंगे। #NoFear #लखीमपुर_किसान_नरसंहार
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 4, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- पूरग्रस्तांचे सांत्वन हा ‘मुखवटा’ अन् त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’; राऊतांचा निशाणा
- ‘मोदीजी तुमचे सरकार आणि मंत्री शेतकरी अनुकूल आहेत की तालिबानी?’
- ‘..ही तानाशाही आहे काय?’ ‘त्या’ घटनेवरून कॉंग्रेसचा संताप
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शिवसेना संपविण्याचे काम केले’, सुभाष साबणेंचा आरोप


