Share

शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून प्रियंका गांधी यांची मोदी सरकावर तिखट शब्दात टीका

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी दिल्लीला जाणारे काही महामार्ग रोखून धरले आहेत. शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखलं असून शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीतही तिथेच ठाण मांडला आहे. सरकारने त्यांना मोकळ्या मैदानावर हटवण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आपल्या लढ्यावर शेतकरी ठाम राहिले.

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं असून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्यावरुन हटविण्यात यावे, अशी मागणी करणारी एक याचिका सुद्धा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, विरोधक देखील आंदोलनाच्या मुद्द्याचा फायदा घेण्यासाठी सरसावले आहेत.

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भर कोरोनाच्या विळख्यात संसदेचे दार उघडून भाजप सरकारने आपल्या अरबपती मित्रांच्या फायद्यांसाठी कृषी विधेयके तयार केली. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मोदी सरकारने संसदेचे दार उघडले नाही. केंद्र सरकारच्या या विधेयकाने 11 शेतकऱ्यांचे तसेच बाबा राम सिंह यांचे जीव घेतले आहे. इवढे अहंकार आणि संवेदनशीलता.असे ट्विट करत प्रियंका यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!