Share

Priyanka Chopra | प्रियंका चोप्रा झाली ४० वर्षांची; बॉलीवूडमध्ये पूर्ण केली २० वर्ष

Published On: 

महाराष्ट्र देशा डेस्क : आज देसी गर्ल प्रियंका चोप्रा तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रियंकाने तिच्या आयुष्यात स्वतःच्या बळावर खूप काही मिळवले आहे. तमिळ चित्रपट ‘थमिझन’मधून तिने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘द हिरो- लव्ह स्टोरी ऑफ द स्पाय’ प्रदर्शित झाला. प्रियंका आता बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही नावाजलेली अभिनेत्री आहे. प्रियंकाने तिच्या 20 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत जवळपास 67 चित्रपटांमध्ये काम केले आहे, तिच्या या योगदानासाठी तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिने एक उत्तम अभिनेत्री, निर्माती, गायिका आणि एक बिझनेस वूमन म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे.

2002 पासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या प्रियंकाने इंडस्ट्रीत 20 वर्षे पूर्ण केली आहेत. या 20 वर्षात प्रियांकाने जवळपास 67 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2003 मध्ये आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटात प्रियंकाला पहिल्यांदा मुख्य अभिनेत्री म्हणून कास्ट करण्यात आले होते. या चित्रपटातील प्रियंकाचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. इथून सुरू झालेला तिचा अभिनयाचा प्रवास आजही सुरू आहे. तिने आपल्या करिअरमध्ये द स्काय इज पिंक, फॅशन, बाजीराव मस्तानी, मेरी कोम, डॉन, अग्निपथ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे ‘द व्हाईट टायगर’ आणि ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन’ बॉलिवूड चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाले होते. प्रियांका 2015 पासून हॉलिवूडमध्ये खूप सक्रिय आहे आणि सध्या ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

प्रियांकाला 2016 मध्ये भारत सरकारने कलेतील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय फॅशन चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तिने आतापर्यंत 5 फिल्मफेअर पुरस्कार आणि 2 पीपल्स चॉईस पुरस्कार पटकावले आहेत. पीपल्स चॉईस पुरस्काराने सन्मानित होणारी प्रियांका ही पहिली दक्षिण आशियाई अभिनेत्री आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!