Share

Priyanka Chaturvedi | “शिंदे गट चार दिन की चांदणी”, प्रियंका चतुर्वेदींचा शिंदे गटावर हल्ला

Published On: 

मुंबई : शिंदे गट आणि ठाकरे गटातील वादाला आत वेगळं वळण मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे अंधेरी (पूर्व) मध्ये पोट निवडणुकीपर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणालाच वापरता येणार नाहीय. एवढंच नाही तर कोणत्याच गटाला शिवसेना पक्षाचं नावही लावता येणार नसल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. अशातच शिवसेना पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आता आयोगाच्या निर्णयावरून शिंदे गटावर हल्ला केला आहे.

काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी ?

यापूर्वी पक्षाचं चिन्ह गोठवल्याचं आम्ही ऐकलं होते. परंतू निवडणूक आयोगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झालं की ‘शिवसेना’ नावही गोठवण्याच आलं आहे. चिन्ह आणि नाव गोठवलं असल तरी, पक्षाचा इतिहास कसे पुसू शकता. बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाला ‘शिवसेना’ नावं दिलं. महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी बाळासाहेब लढले, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम पन्नास खोके गटाने केलं असल्याचं, म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे गटावर चांगलाच वार केला आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

शिंदे गट म्हणजे ‘चार दिन की चांदणी’

शिंदे गट ही भाजपाची बी टीम झाली असून, त्यांचा फक्त वापर करण्यात येईल. शिंदे गट म्हणजे ‘चार दिन की चांदणी’, असं म्हणत चतुर्वेदींनी शिंदे गटाला खोचक टोला लगावाला आहे. पुढे बोलताना त्या असंही म्हणाल्या की,शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे प्रत्येक शिवसैनिकाचे रक्त सळसळत आहे. अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीत मिळेल त्या चिन्हावर लढून, त्यांना उत्तर देणार.

उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोग यांच्याकडे मागणी

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाला ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असं नाव देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ठाकरेंच्या या नावाला आता परवानगी मिळाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!