Share

Car Update | ‘या’ आहेत बेस्ट मायलेज देणाऱ्या कार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: देशाला गेल्या काही काळापासून कार विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत कार उत्पादक कंपनी त्यांचे नवनवीन SUV मॉडेल बाजारात लाँच करत असते. या वाढत्या कारच्या विक्रीमुळे कार उत्पादक कंपन्या आपल्या ग्राहकांना बेस्ट फीचर सोबतच बेस्ट मायलेज देण्याचा प्रयत्न करत असतात. कारण कार खरेदी करताना आपण मायलेजला सर्वाधिक महत्त्व देतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला देशात सर्वोत्तम मायलेज असलेल्या SUV बद्दल सांगणार आहोत.

सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या SUV

मारुती ग्रँड विटारा हायब्रीड

नुकतीच लाँच झालेले मारुतीची मारुती ग्रँड विटारा हायब्रीड ही देशातील सर्वोत्तम मायलेज देणारी कार आहे. या कारमध्ये 1.5L Atkinson सायकल TNGA पेट्रोल इंजन आहे, जे 1155bhp ची मॅक्सीमम पॉवर जनरेट करते. मारुतीची हि SUV 27.97kmpl पर्यंत मायलेज देते. या कारची किंमत 10.45 लाख ते 19.65 लाख एवढी आहे.

टाटा नेक्सॉन डिझेल

टाटा नेक्सॉन डिझेल (21.5kmpl) या कारची गणना देशातील सर्वात सुरक्षित कारमध्ये होते. या SUV चे डिझेल ऑटोमॅटिक व्हेरियंट 21.5 kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम असून ते 110 bhp पॉवर जनरेट करते. या कारची एक्स-शोरुम किंमत 7.60 ते 14.08 लाख रुपये एवढी आहे.

किया सॉनेट डिझेल

किया सॉनेट डिझेल 3 इंजिन पर्यायांसह बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये 1.2L NA पेट्रोल इंजिन, 1.0-L टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर डिझेल हे पर्याय आहेत. या SUV डिझेल मॅन्युअल व्हेरियंट 24.1 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची एक्स-शोरुम किंमत 9.49 लाख रुपये एवढी आहे.

ह्युंडाई वेन्यू डिझेल

ह्युंडाई वेन्यू डिझेल मध्ये असलेले डिझेल इंजिन 99bhp मॅक्झिमम पावर आणि 240Nm टार्क जनरेट करते. ही SUV 23.4 Kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची एक्स-शोरुम किंमत 10 लाख रुपये एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!