मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर पोट निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणालाच वापरता येणार नाहीय. एवढंच नाही तर कोणत्याच गटाला शिवसेना (Shivsena) पक्षाचं नावही लावता येणार नसल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी गंभीर आरोप केला आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर शिवसेनेतील नेते आक्रमक झाले आहेत. याबाबत चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधलाय. चिन्ह गोठवण्याचं हे सगळं कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. त्यांनी कट रचला आणि चिन्ह गोठवलं, असा गंभीर आरोप खैरे यांनी केलाय. तसंच आनंद दिघेसाहेब असते तर एकनाथ शिंदेंना उलटं टांगलं असतं, असंही ते म्हणालेत. तसंच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून भाजप संपून जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया –
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत, ‘जिंकून दाखवणारच’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हा फोटो आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे.
दरम्यान, आता दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नवीन नावाची आणि नवीन निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. सोमवारी, 10 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेश आयोगाकडून देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Rain Update | राज्यात आज ‘या’ भागांत पावसाचा येलो अलर्ट
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ नाव देण्याची मागणी
- BJP | “मुख्यमंत्रीपदापायी मती गेली अन्…”; भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
- Uddhav Thackeray | निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- MNS | “उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे…”; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्ला


