Share

Rahul Gandhi | राहुल गांधींच्या काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवडीला महाराष्ट्रातून विरोध

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र कांग्रेसमध्ये मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला आहे. राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीचा ठराव काल मंजूर करण्यात आला. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी या निर्णयाला विरोध केला. कांग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी सहभाग घ्यावा, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वी देखील पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. यापूर्वी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे सचिव वीरेंद्र वशिष्ठ यांनी नुकत्याच झालेल्या टेलिव्हिजन डिबेट शोमध्ये राहुल गांधींविरोधात बोलल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध केला होता. यासोबतच काँग्रेस नेते वीरेंद्र वशिष्ठ यांनी काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख तारिक अन्वर यांना मेल पाठवून माजी मुख्यमंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली-

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी 30 ऑगस्ट रोजी जी-23 गटाचा भाग असलेले गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुडा आणि आनंद शर्मा हेही जी-23 चे सदस्य होते. काँग्रेसच्या जी-23 नेत्यांमध्ये शशी थरूर, गुलाम नबी आझाद (माजी काँग्रेस नेते), मणिशंकर अय्यर, मनीष तिवारी यांचा समावेश आहे ज्यांनी काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदलाबाबत आवाज उठवला आहे.

जी-23 च्या नेत्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून संघटनेत बदल आणि सर्व स्तरांवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती. आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण आणि भूपिंदर सिंग हुड्डा यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासोबत जी-23 च्या भविष्यातील रणनीतीवर चर्चा केल्याचे समजते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!