Share

Shivsena | दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आक्रमक! घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दसरा मेळाव्यावरुन राज्यात राजकारण चांगलच तापल आहे. शिंदे गट आणि मुळ शिवसेना दसरा मेळावा घेणार आहेत. शिंदे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी बीकेसी मैदान मिळाले. मात्र शिवसेनेच्या परवानगी अर्जावर अजूनही टांगती तलवार आहे. दरम्यान शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे शिष्टमंडळ आज मुंबई पालिकेच्या जी नॉर्थ कार्यालयात जाणार आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत निर्णय न झाल्यामुळे सेना आता आक्रमक झाली आहे.

दोन्ही गट मूळ शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. तर शिवसैनिक आजही आपल्या पाठिशी आहेत, असा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्यातून द्यायचा आहे, मात्र त्याच्या परवानगीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानासाठी अर्ज दखल केला होता. यानंतर आता आता सूत्रांकडून मोठी माहिती समोर आली आहे.

बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार –

बीकेसीतील मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा अर्ज महापालिकेने स्विकारल्याची माहिती देखील समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या वतीने देखील दसरा मेळाव्यासाठी बीकेसीतील मैदानाची मागणी करण्यात आली होती. मात्र महापालिकेकडून शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार! – उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये दसरा मेळावा संदर्भात नेत्यांना आदेश देण्यात आले आहेत. यादरम्यान शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार त्यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता महिला आघाडी, युवा सेना, शिवसेनिकांसोबत घ्या, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!